Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Vikrant विक्रांत’ बचाव निधी, सोमय्याचा विधी

1 Mins read

सतरा वर्षांपूर्वी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तीर्थकुंडात गोपाळ बडवे नावाचा ‘बडवा’ लघवी करताना सुरक्षारक्षकांनी पकडला. तेव्हा ‘हे मी नेहमीच करतो,’ असं तो सहजपणे म्हणाला.

अगदी त्याच सहजतेने ”युद्धनौका Vikrant ‘विक्रांत बचाव’साठीचा निधी जमवणे, हे प्रातिनिधिक होते. जेमतेम ३५ मिनिटं आम्ही मुंबईत चर्चगेट स्टेशन बाहेर उभं राहून डबे फिरवले. त्यात किती पैसे जमणार!”

असे म्हणत ‘भाजप’ नेते किरीट सोमय्या यांनी ‘शिवसेना’ नेते व खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना झटकण्याचा प्रयत्न केला.

”१९७१ च्या भारत-पाक युद्धात ऐतिहासिक कामगिरी बजावलेल्या युद्धनौका Vikrant ‘आयएन एस – विक्रांत’चं योग्य प्रकारे प्रेरणादायी जतन- स्मारक व्हावं; ती भंगारात जाऊ नये यासाठी किरीट सोमय्या यांनी २०१३ मध्ये पुढाकार घेऊन निधी जमवण्याची मोहीम राबवली होती. ती रक्कम ५८ कोटी रुपये आहे. ती कुठे जमा केली?” असा संजय राऊत यांचा सवाल आहे.

तो माजी लष्करी अधिकारी भोसले यांना ‘माहिती अधिकारा’त मिळालेल्या माहितीनुसार ‘राजभवन’मध्ये जमा झालेला नाही. ”तो पैसा किरीट सोमय्या यांनी ‘एस बँक’मध्ये पांढरा करून आपल्या निवडणुकीसाठी आणि कंपन्यात गुंतवण्यासाठीही वापरला,” असे संजय राऊत यांचे म्हणणे आहेत.

हे पुढचे आरोप शह-काटशहाचा भाग असू शकेल. परंतु, Vikrant ‘विक्रांत बचाव निधी’चे काय झाले, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण तो लोकभावनेशी खेळलेला राष्ट्रविरोधी खेळ आहे!

त्याची दखल घेऊनच हे प्रकरण पोलिसात दाखल झालं आणि मीडिया प्रसिद्धीसाठी हपापलेल्या किरीट सोमय्या यांना लपून राहून अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज करावा लागला.

तो अर्ज कोर्टाने नाकारला. (हायकोर्टात अपिलात गेल्यावर अटकपुर्व जामीन मंजूर झाला.) हे प्रकरण घोटाळ्याचे ठरले. कारण ’धर्मादाय आयुक्त’ कार्यालयाच्या परवानगीशिवाय सार्वजनिक कार्यासाठी निधी जमवणे, हे बेकायदेशीर ठरते.

जमवलेल्या निधीचे काय केले, त्याचाही अहवाल ‘धर्मदाय आयुक्त’ला देणंही बंधनकारक असतं. ते किरीट सोमय्या यांच्याकडून झालेले नाही. ‘जमवलेला निधी पक्षाकडे जमा केला,’ असं ते म्हणतात.

त्यातून ‘निधी जमवला’ हे स्पष्ट होतं. हा ‘निधी किती होता,’ ह्याला महत्त्व नाही. त्याची गोलमाल दखलपात्र आहे.

Also Visit : https://www.postboxlive.com

अशाच प्रकारे १९९०च्या अडवाणी यांच्या ‘सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा’च्या वेळी ‘संघ – भाजप परिवार’ने घरातल्या नळाचं – पिंपातलं पाणी दहा रुपये प्रति – बाटली दराने ‘गंगाजला’चा प्रतिनिधिक नमुना लोकांना जोखण्यासाठी वापरला.

नंतर राम जन्मभूमी मंदिर बांधण्यासाठी देशभरातील लाखो बंजरंगींना गावोगावीच्या विटा डोक्यावरून वाहायला लावून अयोध्येत जमवले. त्यातील एकही वीट सध्या बांधलं जात असलेल्या राम मंदिरासाठी वापरली जाणार नाही.

कारण ते मंदिर पूर्णपणे राजस्थानी दगडाचं आहे. ह्या फुकटच्या हमालीची, फसवणुकीची जाणीव मेंदूचे दगड झालेल्यांना ‘प्रातिनिधिक’चे तीर्थ पाजल्याने अजूनही होत नाही.

 

Also Read : https://www.postboxindia.com/शरद-पवार-सामना-आता-निकराच/

१९९९ च्या कारगील युद्धाच्या वेळीही मोठ्या प्रमाणात निधी संकलन झाले. एका नामवंत दैनिकाने जमवलेला करोडो रुपयांचा निधी तीन-चार वर्षं वापरला. त्याची चर्चा होऊ लागली, तसा तो लष्करी इमारत उभारणीसाठी दिला.

ह्या उपकाराबद्दल ‘वाजपेयी सरकार’ने दैनिकाच्या मालकाला ’राष्ट्रीय पुरस्कार’ने सन्मानित केले. अलीकडे ‘कोरोना- लॉकडाऊन’ काळात मोठ्या प्रमाणात ‘व्हॉटस अॅप’च्या माध्यमातून निधी संकलन झालं. त्यात आपल्या आपल्यात पैसा व मदत वाटण्याची, निधी हडप केल्याची प्रकरणं आता बाहेर येऊ लागलीत. त्याने राज्यपाल कोश्यारी यांनी बहाल केलेले ‘कोरोना योद्धे’, ‘देवदूत’ हे किताब खोटे ठरतील.

ह्याच काळात अयोध्येतल्या ’राम जन्मभूमी मंदिर निर्माण’साठीही निधी संकलन झाले. त्यासाठी भक्त मंडळी पावतीपुस्तकं घरोघरी घेऊन फिरत होते. ते पैसे कुठे गेले असतील, त्याचे ठिकाण किरीट सोमय्या यांनी दाखवून दिलेय. तिथे जाऊन हिशेब तपासला पाहिजे. त्याशिवाय लोकभावनेला लुबाडण्याचा; वापरण्याचा खेळ थांबणार नाही!

Leave a Reply

error: Content is protected !!